वरिष्ठ लिपिकासह तिघावर लाच घेताना कारवाई

। बाळकडू : ज्ञानेश्वर शिंदे पुणे : राज्य सावकाराचे निबंधक व विशेष निबंधक जमीनीबाबतचा पुनर्निरीक्षणाचा निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्विकारणाऱ्या वरिष्ठ लिपिकासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली. वरिष्ठ लिपिक अशोक देवराम गिते (वय ३६, वर्षे), सेवानिवृत्त व सध्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या नंदकिशोर रामचंद्र झिने (वय ५९) व सतीश क्षीरसागर असे कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी ५० वर्षीय व्यक्तिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. फिर्यादी यांच्यासह अन्य दोघांच्या जमिनीबाबतचे प्रकरण जालना येथील सावकाराचे निबंधक कार्यालय व औरंगाबाद येथील विभागीय निबंधक सहकारी कार्यालयाने तक्रारदार यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्या निकालाविरुद्ध तक्रारदार व अन्य दोन यांचे जमिनी संबधाने उप निबंधक/ सावकाराचे निबंधक जालना यांनी तसेच विभागीय निबंधक सहकारी संस्था औरंगाबाद यांनी तक्रारदार यांच्या प्रकरणांचा निकाल तक्रारदार यांचे बाजूने दिला होता. त्या निकालाविरुद्ध पुनर्निरक्षणाचे (रिव्हिजन) अर्ज विरोधी पक्षकाराने पुण्यातील राज्य सावकाराचे महानिबंधक व विशेष निबंधक सहकारी संस्था या कार्यालयाकडे दाखल केले होते. त्या तीन रिव्हिजनपैकी दोन रिव्हिजनचे निकाल हे तक्रारदार यांचे विरोधात दिले गेले, उर्वरित एक निकाल महानिबंधक याना सांगून तक्रारदार यांच्या बाजूने करून देतो असे सांगून