लातूर : आजच्या स्पर्धे च्या युगात मराठी भाषेवर इतर भाषेचे सावट येऊ लागल्याने आपली मराठी मातृभाषा लुप्त होऊ लागली आहे. तेव्हा मराठी मातृभाषेची अस्मिता संवर्धनाची जबाबदारी सर्वानी जपायला हवी, असे प्रतिपादन महात्मा बसवेश्र्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे यांनी केले. विभागीय, जिल्हा माहिती कार्यालय,श्री. महात्मा बसवेश्र्वर महाविद्यालय आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदावरुन ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक यशवंत भंडारे, कवयीत्री सौ.शैलजा कारंडे, मराठी विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर बेडगे, प्रा. राजाभाऊ होळकुंदे, प्रा. शिवप्रकाश डोंगरे ,जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के उपस्थित होते. - या वेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. सिद्राम डोगरगे म्हणाले की, सध्याच्या स्पर्धे च्या युगात आमची मातृभाषा मराठीवर इतर भाषेचे सावट येऊ लागल्याने मराठी भाषा फक्त लुप्त होऊ लागली आहे. यासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेचे संवर्धन करुनमराठी भाषेची अस्मिता स्वीकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन करुन मराठी भाषेमधील तत्वज्ञान सर्वांनी घ्यावे असे आवाहन केले.
सर्वांनी जपायला हवीमराठी भाषेची अस्मिता सर्वांनी जपायला